www.24taas.com, मुंबई
बेस्ट कर्मचा-यांना यंदा दिवाळीचा बोनस मिळणार नाही. बेस्ट प्रशासनाच्या बैठकीत बोनस न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बेस्टचा तोटा 3 हजार कोटींवर पोहचल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र बोनस दिला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा बेस्टच्या कर्मचा-यांनी दिलाय.
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बेस्टची अवस्था हलाखीची झाली असून मुंबई महापालिकेकडून 12 टक्के व्याजदरानं तातडीनं कर्ज घेतलं तरच दिवाळीत कर्मचा-यांना पगार देता येईल अशी माहिती बेस्ट व्यवस्थापनामार्फत देण्यात आली होती.
दुसरीकडे बेस्ट उपक्रम हा महापालिकेचाच भाग असल्यानं एवढ्या व्याजदरानं कर्ज घेणं योग्य नसल्याचं काँग्रेसनं म्हटलं. त्यामुळे शून्य टक्के दराने पालिकेनं कर्ज द्यावं अशी मागणी काँग्रेसनं केली. या सगळ्यामुळे दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नसल्याचं अखेर स्पष्ट करण्यात आलं.