लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांच्या संकल्पनेला कंपनीचा नकार

बंद दरवाजाच्या लोकल मुंबईच्या उपनगरीय मार्गावर सुरू करण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय. स्वयंचलित दरवाजे पुरवणाऱ्या कंपनीनंच या संकल्पनेला नकार दिलाय. 

Updated: Feb 8, 2016, 09:05 AM IST
लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांच्या संकल्पनेला कंपनीचा नकार title=

मुंबई : बंद दरवाजाच्या लोकल मुंबईच्या उपनगरीय मार्गावर सुरू करण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय. स्वयंचलित दरवाजे पुरवणाऱ्या कंपनीनंच या संकल्पनेला नकार दिलाय. 

मुंबईत लोकलमध्ये असणाऱ्या अमाप गर्दीच्या वेळी दरवाजे बंद ठेवले तर प्रवासी गुदमरतील अशी भीती दरवाजे पुरवणाऱ्या कंपनीनं व्यक्त केलीय. त्यामुळे लोक गुदरमरून मृत्यूमुखी पडले तर कंपनीची प्रतिमा डागाळेल या भीतीनं स्वयंचलित दरवाजे पुरवण्यास कंपनीनं नकार दिलाय. 

काही महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वेवर महिलांच्या एका डब्याला स्वयंचलित दरवाजे बसवून प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली. पण आता कंपनीनंच ही सुविधा देण्यास नकार दिलाय. त्यामुळे या योजनेचं पुढे काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.