मुंबई : माजी खासदार समीर भूजबळ यांची ईडी कोठडी आज संपतेय. तीन कंपन्यांमध्ये पैशांची अफरातफर आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी समीर भुजबळांना अटक करण्यात आलीय.
महाराष्ट्र सदनमध्ये कॉन्ट्रॅक्टरला फायदा मिळून देणे आणि त्या बदल्यात स्वत:च्या कंपनीला फायदा मिळवणे, हेक्स वर्ल्ड कंस्ट्रक्शन कंपनी मार्फत बेहिशोबी मालमत्ता जमा करणे, MET घोटाळा आणि कलिना सरकारी लायब्ररीची जमीन लाटणे असे आरोप समीर भुजबळांवर लावण्यात आलेत.
आता आज पुन्हा त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. तर दुसरीकडे पंकज भुजबळ यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.