प्रितम, पंकजा मुंडेंच्या विरोधात शिवसेनेची उमेदवारी नाही

गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्याची आमचे पारिवारिक संबंध होते, आणि यानंतरही आपण हे संबंध कायम ठेवणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Updated: Sep 28, 2014, 10:44 AM IST
प्रितम, पंकजा मुंडेंच्या विरोधात शिवसेनेची उमेदवारी नाही title=

मुंबई: गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्याची आमचे पारिवारिक संबंध होते, आणि यानंतरही आपण हे संबंध कायम ठेवणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एका प्रचार सभेत बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर जी शोकसभा झाली. त्या शोकसभेत आपण पंकजा मुंडे यांना सतत साथ देण्याचं वचन दिलं होतं.

पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, यावेळी मी सांगितलं होतं,  पंकजा राजकारण बाजूला ठेवं, कधीही हाक मार तुझा भाऊ तुझ्यासाठी सदैव तयार असेल, शिवसेना महाराष्ट्रातील सर्व जागा लढवणार पण पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांच्याविरोधात शिवसेना निवडणूक लढवणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. बहिणीशी लढण्याची आमची संस्कृती नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.