मुंबई : मेडिकल प्रवेशासाठी नीटसंदर्भातल्या निर्णयाचा परिणाम आता इंजिनिअरिंगच्या प्रवेशांवरही झालाय. यंदाच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. यंदा सर्व प्रवेश मेरीटनुसारच होणार आहेत.
अल्पसंख्याक कॉलेजेस, मॅनेजमेंट कोटा आणि खासगी कॉलेजेसमधील सर्व प्रवेश मेरीटनुसारच करावे लागणार आहेत. कॉलेजांच्या कोट्याची मेरीट लिस्टही डीटीई लावणार आहे. त्यामुळं गुणवंत विद्यार्थ्यांना डावलून कोणालाही प्रवेश देता येणार नाही. मेडिकल नीटमुळं ठेच लागल्यानंतर इंजिनिअरिंगच्या प्रवेशांबाबत सरकारला शहाणपण सूचलंय.