...तर गाडीवर कोकण असे लिहा

गणेशोत्सवासाठी मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गऐवजी पर्यायी मुंबई-पनवेल-पुणे-सातारा-कोल्हापूर या मार्गाने आपल्या गावी जाणार्या गणेश भक्तांना जाता येता टोल माफी मिळावी अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय. 

Updated: Aug 22, 2016, 08:08 PM IST
...तर गाडीवर कोकण असे लिहा title=

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गऐवजी पर्यायी मुंबई-पनवेल-पुणे-सातारा-कोल्हापूर या मार्गाने आपल्या गावी जाणार्या गणेश भक्तांना जाता येता टोल माफी मिळावी अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय. 

महाडच्या सावित्री नदीवरील पुलाला झालेल्या दुर्घटनेमुळे कोकणात जाणाऱया चाकरमान्यांना पर्यायी मार्ग म्हणून पनवेल,पुणे,कोल्हापूर आणि सातारा या महामार्गाचा वापर  करावा लागेल. या मार्गावर कोकणच्या चाकरमान्यांना टोल भरावा लागू नये म्हणून या मार्गावर टोलमाफी असावी अशी मागणी नितेश यांनी केलीये. 

याबाबतचे पत्र  त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीलंय. दरम्यान, यावर सरकारकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. 

त्यावर सरकारने अजून कोणतंही उत्तर दिलेलं नाही. 25 ऑगस्टपर्यंत टोलमाफी केली नाही  तर टोलनाक्यांवर उतरुन ज्या गाड्यांवर कोकण लिहीलं असेल त्या गाड्यांकडून टोल वसूल करू देणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय. 

तसेच कोकणात जात असाल तर गाडीवर कोकण असं लिहावं असंही त्यांनी यावेळी आवाहन केलं.