एक एप्रिलची बातमी चुकून छापली; सेनेची मिश्किल प्रतिक्रिया

महायुतीत ‘मनसे’ सहभागी होणार या बातमीवर शिवसेना नेत्यांनी मात्र कानावर हात ठेवलेत.

Updated: Mar 8, 2013, 09:45 AM IST

www.24taas.com, मुंबई
महायुतीत ‘मनसे’ सहभागी होणार या बातमीवर शिवसेना नेत्यांनी मात्र कानावर हात ठेवलेत. ही बातमी देणाऱ्या ‘त्या’ वर्तमानपत्रानं एक एप्रिलचा अंक आजच छापून लोकांचा एप्रिलफुल केलंय, अशी मिश्किल प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी शिवसेना नेत्यांनी या बातमीशी फारकत घेतलीय.
असं घडत असेल तर पक्षाच्या जीवनात ती महत्त्वाची घटना असेल... पण, आपल्याकडे ठाम पुरावा नसताना अशी बातमी दिलीच कशी? ही बातमी देणाऱ्या शिवसेना नेत्याचं नाव या वर्तमानपत्रानं जाहीर करावं, अशी मागणी शिवसेना नेते मनोहर जोशींनी केली. सोबतच शिवसेनेची अधिकृत भूमिका `सामना` वृत्तपत्रातून जाहीर होईलच, असं स्पष्टीकरणही जोशींनी दिलीय.

या आघाडीचा पहिला टप्पा म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सहा जागा शिवसेना-भाजप आणि मनसे यांच्यात समप्रमाणात वाटून घेण्याचा निर्णय अंतिम टप्यात आल्याची बातमी नुकतीच आली होती. त्यावरच शिवसेना नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.