'पिचकारी' मारणाऱ्यांवर कारवाईसाठी सरकारचा नवा कायदा

यापुढे रस्त्यावर थुंकाल तर खबरदार... सार्वजनिक ठिकाणी 'पिचकारी' मारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवा कायदा करणार आहे. 

Updated: Jun 16, 2015, 08:19 PM IST
'पिचकारी' मारणाऱ्यांवर कारवाईसाठी सरकारचा नवा कायदा title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: यापुढे रस्त्यावर थुंकाल तर खबरदार... सार्वजनिक ठिकाणी 'पिचकारी' मारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवा कायदा करणार आहे. 

त्यानुसार एखादी व्यक्ती पहिल्यांदा थुंकताना सापडली तर 1 हजार रूपये दंड आणि एक दिवस स्वच्छतेची सामाजिक सेवा अशी शिक्षा त्या व्यक्तीला होईल. दुसऱ्यांदा थुंकताना सापडल्यास 3 हजार रूपये दंड आणि तीन दिवस सामाजिक सेवा, तर तिसऱ्यांदा थुंकताना सापडल्यास 5 हजार रूपये दंड आणि पाच दिवस सामाजिक सेवा त्या व्यक्तीला करावी लागणाराय. 

कायद्यातील या तरतुदींबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली. हा कायदा करण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.