`टीआरपी` मोजण्याचा नवा फॉर्म्युला...

टीव्ही चॅनलची लोकप्रियता मोजण्यासाठी आता नवीन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. एखादं टीव्ही चॅनल किती पॉप्युलर आहे, हे जाणून घेण्यासाठी सध्या प्रेक्षक संख्या मोजमाप पद्धतीचा वापर केला जातो.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 22, 2014, 01:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टीव्ही चॅनलची लोकप्रियता मोजण्यासाठी आता नवीन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. एखादं टीव्ही चॅनल किती पॉप्युलर आहे, हे जाणून घेण्यासाठी सध्या प्रेक्षक संख्या मोजमाप पद्धतीचा वापर केला जातो. परंतु ही पद्धत तसेच तिच्या पारदर्शकतेबद्दल वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं.
अशा परिस्थितीत ब्रॉडकास्टर्स चॅनलवाले, जाहिरातदार आणि जाहिरात एजन्सींच्या `बीएआरसी` या संघटनेनं `मीडियामेट्री` या फ्रान्सच्या कंपनीसोबत वॉटरमार्क पद्धत लागू करण्यासाठी करार केलाय. ही नवी पद्धती सध्याच्या पद्धतीपेक्षा अधिक विश्वसनीय आणि पारदर्शक मानली जातेय. वॉटरमार्क पद्धत सध्याच्या पद्धतीपेक्षा स्वस्तदेखील आहे. कारण, यामध्ये जे मीटर लावले जातात, त्यांचा खर्च तुलनेने कमी आहे.
अमेरिका, फ्रान्स आणि मोरक्कोसारख्या देशांमध्ये वॉटरमार्क पद्धतीचा वापर केला जातो. `बीएआरसी` लवकरच `मीटर पार्टनर`चे नाव जाहीर करणार आहे. सध्या या पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प सुरू असून, ऑक्टोबरपासून टीव्ही ग्राहकांचे `लाइव्ह` आकडे मिळायला सुरूवात होईल. नव्या पद्धतीनुसार, सॅम्पल ग्राहकांची संख्या १० हजार मीटरवरून वाढवून २० ते २५ हजार मीटर एवढी करण्यात येणार आहे. त्यानंतर मीटरची संख्या आणखी ५० हजारपर्यंत वाढणार आहे.

जाहिरातदार आणि जाहिरात एजन्सी यांच्यासाठी प्रेक्षकांची संख्या हा महत्त्वाचा घटक असतो. चॅनल्स आणि कार्यक्रमांची लोकप्रियता लक्षात घेऊन जाहिरातदार आपल्या ग्राहकांचे लक्ष्य निश्चित करत असतात. परंतु हे आकडे योग्य नसतील, तर कठीण होऊन जाते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.