शिवसेनेत राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेवकांचा प्रवेश

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आयाराम-गयारामचा सुळसुळाट वाढला आहे. शिवसेनेने अन्य राजकीय पक्षातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. 

Updated: Oct 18, 2016, 09:36 PM IST
शिवसेनेत राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेवकांचा प्रवेश title=
राष्ट्रवादी नगरसेविका रिद्धी भास्कर खुरसंगे यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आयाराम-गयारामचा सुळसुळाट वाढला आहे. शिवसेनेने अन्य राजकीय पक्षातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबई आणि नाशिक मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 'मातोश्री' वर हा कार्यक्रम पार पडला. 

मुंबईतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका रिद्धी फुरसुंगे, नाशिक मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि कट्टर भुजबळ समर्थक शिवाजी चुंबळे, कल्पना चुंबळे तसेच मनसे नगरसेवक अशोक सातभाई यांनी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी दिली. अन्य पक्षातील प्रमुख पदाधिकारी प्रवेश करीत असल्यामुळे नाशिकमधे शिवसेनेची ताकद वाढली आहे.