राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचं निधन, दुपारी अंत्यसंस्कार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. फुफ्फुसांच्या जंतु संसर्गानं ग्रस्त असलेले गोविंदराव आदिक गेल्या ८ दिवसांपासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. 

Updated: Jun 7, 2015, 02:09 PM IST
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचं निधन, दुपारी अंत्यसंस्कार title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. फुफ्फुसांच्या जंतु संसर्गानं ग्रस्त असलेले गोविंदराव आदिक गेल्या ८ दिवसांपासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. 

शनिवारी आदिकांची तब्येत अचानक खालावल्यानं ते उपचारांनाही प्रतिसाद देत नव्हते. अखेरीस रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. गोविंदराव आदिक यांचं पार्थिव सकाळी ९ वाजता श्रीरामपूर इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी ४ वाजता श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर इथल्या पब्लिक स्कूलच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

तब्बल ४५ वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या गोविंदराव आदिकांनी वर्षभरापूर्वी राजकारणातून निवृत्ती घेतली होती.  

गोविंदराव आदिक यांचा अल्प परिचय:
 
- गोविंदराव आदिक काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांचे समर्थक नंतर काँग्रेस एसमध्ये सहभागी झाले.
 
- १९८० मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद भूषविले.
 
- राज्यसभेचे माजी खासदार
 
- २ वेळा काँग्रेसचे आमदार, महाराष्ट्रात काही काळ कृषिमंत्री होते.
 
- २००९ला काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.