राष्ट्रवादीच्या `जेरी`नं आणलं `टॉम`ला जेरीस!

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटलाय. दोन्ही पक्षांनी २६-२२ फॉर्म्युलावर एकमतानं शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 10, 2014, 08:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटलाय. दोन्ही पक्षांनी २६-२२ फॉर्म्युलावर एकमतानं शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलंय.
जागावाटपाच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीनं गंभीर आणि आक्रमक भूमिका घेतली होती. याबाबतीत राष्ट्रवादीचं दबावतंत्र यशस्वी झाल्याचं चित्र दिसतंय. जागावाटपाच्या बाबतीत काँग्रेसनं मोठ्या भावाची भूमिका स्वीकारून एक पाऊल मागे घेतल्याचंही या फॉर्म्युल्यामधून दिसून येतंय.
जागा वाटपाचा तिढा सुटला असला तर अजून जागा अदलाबदलीवर खल बाकी आहे. यामुळेच जागा अदलाबदलीबाबत उद्या पुन्हा होणार बैठक होणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.