भास्कर जाधव प्रदेशाध्यक्ष तर आव्हाड कार्याध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव यांची निवड झालीय. प्रदेशाध्यक्षपदासाठी आर.आर. पाटील, जितेंद्र आव्हाड यांचीही नावं चर्चेत होती. पण, या सर्वांना बाजूला सारत जाधवांच्या नावावर शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 15, 2013, 02:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव यांची निवड झालीय. प्रदेशाध्यक्षपदासाठी आर.आर. पाटील, जितेंद्र आव्हाड यांचीही नावं चर्चेत होती. पण, या सर्वांना बाजूला सारत जाधवांच्या नावावर शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलंय.
आज मुंबईत पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. भास्कर जाधव हे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचं वृत्त ‘झी २४ तास` नं सर्वप्रथम दिलं होतं. ‘झी २४ तास’च्या वृत्तावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलंय. गुहागरचे आमदार असलेल्या जाधव यांनी मागील निवडणुकीत शिवसेना नेते रामदास कदम यांना पराभूत केलं होतं. चार दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात जाधव यांना वगळण्यात आलं होतं. आता आगामी निवडणुकीत जाधव यांच्यावर पक्ष वाढवण्याची जबाबदारी असणार आहे. तर मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.

भास्कर जाधव यांच्या कारकिर्दीवर एक नजर...
> १९९५ आणि ९९ - चिपळूणमधून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी
> २००४ - शिवसेनेनं तिकीट नाकारल्यामुळं बंडखोरी
> २००४ - अपक्ष म्हणून लढले, राष्ट्रवादीच्या रमेश कदमांकडून पराभव
> राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधान परिषेदत आमदार
> २००९ - राष्ट्रवादीकडून विधानसभेवर निवड, राज्यमंत्रिपदी वर्णी
> कोकणातील आक्रमक नेते म्हणून ओळख
> सुनील तटकरे, उदय सामंत यांच्याशी फारसे सख्य नाही
> नारायण राणेंशी नेहमीच संघर्षाची भूमिका
> दुष्काळात मुलाच्या शाही लग्नामुळे वादात
> मंत्रिमंडळ फेरबदलात जाधवांचे मंत्रिपद गेले
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.