नवी मुंबई विमानतळ, पुणे हायवे अधिक जवळ येणार

नाव्हाशेवा - शिवडी या 22 किमी लांबीच्या समुद्र सेतुचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई ट्रांसहार्बर लिंक प्रकल्पाला सीआरझेड आणि तिवरांच्या जंगलाबाबत वन विभागाची परवानगी मिळाल्याचं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितलंय. 

Updated: Jan 2, 2016, 04:23 PM IST
नवी मुंबई विमानतळ, पुणे हायवे अधिक जवळ येणार  title=

मुंबई : नाव्हाशेवा - शिवडी या 22 किमी लांबीच्या समुद्र सेतुचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई ट्रांसहार्बर लिंक प्रकल्पाला सीआरझेड आणि तिवरांच्या जंगलाबाबत वन विभागाची परवानगी मिळाल्याचं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितलंय. 

हा देशातला सर्वात जास्त लांबीचा समुद्र हेतु ठरणार आहे. या प्रकल्पामुळे फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवडी पाणथळ जागेला धोका निर्माण होणार होता. मात्र या जागेचं अस्तित्व कायम राखत काम करण्याचं बंधन असणार आहे. 

या प्रकल्पामुळे नवी मुंबईतलं नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईपासून अवघ्या काही मिनिटांवर येईल. तसंच गोवा हायवे आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पोहोचण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.