www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उत्तर प्रदेशातील सभेत `विजयाचा शंखनाद` करणारे नरेंद्र मोदी सध्या मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्पेक्समध्ये आपल्या घणाघाती भाषणानं लोकांना प्रभावित करत आहेत. दिल्लीच्या सिंहासनावरून काँग्रेसला खाली खेचण्यासाठी नरेंद्र मोदींना मराठी मावळ्यांची दमदार फौज सोबतीला घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीनं महाराष्ट्राच्या भूमीत मोदींची महागर्जना महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
पाहा... काय म्हटलंय मोदींनी
मुंबई: नरेंद्र मोदींच्या महागर्जनेला सुरुवात
भाषणाची केली मराठीतून सुरुवात
शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला नमस्कार-मोदी
काँग्रेसमुक्त भारत करण्यास महाराष्ट्र आघाडीवर राहील- मोदी
आम्हा गुजरातींसाठी मुंबई दुसरं घर आहे- मोदी
मुंबई गुजराती भाषेचं माहेर असल्याचंच वाटतं
महाराष्ट्र मोठा भाऊ, गुजरात छोटा भाऊ
गुजरातनंतर वेगळा झाला, मात्र आतापर्यंत फक्त १४ मुख्यमंत्री
महाराष्ट्रात आतापर्यंत २६ मुख्यमंत्री झाले
काँग्रेसमुक्त भारत होणं देशाची गरज- मोदी
सरदार पटेलांनी देशाला एक केलं, मात्र काँग्रेसनं फोडलं
भावा-भावांमध्ये भांडण लावून काँग्रेसनं केलं राज्य
व्होटबँकेचं राजकारण सोडून भाजप विकासाचं राजकारण करणार
भारतीय जनता पक्ष विकासाच्या राजकारणावरच समर्पित
नरेंद्र मोदींनी केलं शिवराज सिंह चौहान यांची स्तुती
मध्य प्रदेशची प्रगती भाजपनं केली
धानाच्या शेतीत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला भाजप सरकारनं केलं अव्वल
मात्र सरकारवर मोदींची टीका
काँग्रेसला विकासाच्या राजकारणात रस नाही
महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो ते काँग्रेसमुळं...
नाव न घेता मोदींची राहुल गांधींवर टीका
राहुल गांधींच्या कालच्या भ्रष्टाचार विरोधी भाषणाची उडवली खिल्ली
'आदर्श' प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न
तर दुसरीकडे काँग्रेस नेत्याचा दिल्लीत उपदेश
एलबीटी म्हणजे लूट बाटनें की टेक्निक- मोदी
देशातला काळा पैसा स्वीस बँकेत जमा करतात- मोदी
लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वात काळा पैसा परत आणण्याची केली मागणी
काँग्रेस सरकार काळा पैसा देशात परत आणू पाहत नाही
भाजप सरकार काळा पैसा परत आणेल - मोदी
टीव्हीवर नसलो तरी चालेल जनतेच्या हृदयात आहे- मोदी
केबल टीव्हीवर मोदी दिसो न दिसो, लोकांच्या मनात मोदी
काँग्रेसमुळं युवापिढी निराशेच्या छायेत- मोदी
तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला पाहिजे- मोदी
देशात श्रमिकांचा सन्मान व्हायला हवा - मोदी
गुजरातमध्ये शिक्षणासाठी दरवाजे उघड - मोदी
गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला वाव- मोदी
महाराष्ट्र आणि गुजरात चेकपोस्टचं उदाहरण
मागील १० वर्षात महाराष्ट्र चेकपोस्टची कमाई ४३७ कोटी केवळ
तर गुजरात चेकपोस्टची कमाई आहे तब्बल १४७० कोटी
महाराष्ट्रात नोकरीसाठी शिफारशीची गरज- मोदी
गुजरातमध्ये असं होत नाही, नवा प्रयोग केला
गुजरातमध्ये गुणवेत्तेच्या आधारे नोकऱ्या दिल्या
टेक्नॉलॉजीचा वापर करुन केली उमेदवारांची निवड
सरदार सरोवर डॅमवर दरवाजे लावण्यासाठी परवानगी देत नाही
या प्रकल्पामुळं महाराष्ट्रालाही मिळणार वीज
विकास करायचा असेल तर तो होऊ शकतो
महाराष्ट्राला सुराज्य नाही मिळालं, सुशासनाची गरज- मोदी
सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, मोदींची घोषणा
सरकारच्या नाकर्तेपणामुळं सुराज्य नाही- मोदी
ऐतिहासिक विक्रांतला विकण्याचा डाव -मोदी
आमचा तुकडे जोडून सर्व एकत्र आणण्याचा प्रयत्न
तर काँग्रेस ऐतिहासिक विक्रांतचे तुकडे करण्याच्या मागे
मुंबईत फिल्म यूनिर्व्हसिटीची गरज - मोदी
यंदा भारतीय चित्रपटांचं १०० वर्ष
नरेंद्र मोदींनी सांगितलं भारतीय चित्रपटांचं महत्त्व
२०१४मध्ये पक्षासाठी नाही देशासाठी मतदान करा- मोदी
व्होट फॉर इंडिया, मोदींचा नवा नारा
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.