मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटले या आज दिवसभर चाललेल्या चर्चेवर स्पष्टीकरण देण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी भेटीचा इन्कार केला. पण पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना आपल्या शैली चांगलीच टोलेबाजी केली.