मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पासष्टीचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्तेपरिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याशिवाय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील असे वेगवेगळ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते राणेंच्या सत्कारला हजर होते.
सुशीलकुमार शिंदे सोडले तरं कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही बडा नेते मंचावर हजर नव्हता. यावेळी बोलताना गडकरी आणि सुशीलकुमार शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली तर विरोधी पक्षात असूनही आपण सुशीलकुमार यांना मुख्यमंत्री कसं बनवलं याचा किस्सा नारायण राणेंनी सांगितला.