पावसाळा तोंडावर मात्र नालेसफाई अपूर्णच

पावसाळा काही दिवसांवर आला असला तरी मुंबईतील नालेसफाई अजून पूर्ण झालेली नाही. 

Updated: Jun 2, 2016, 08:31 AM IST
पावसाळा तोंडावर मात्र नालेसफाई अपूर्णच title=

मुंबई : पावसाळा काही दिवसांवर आला असला तरी मुंबईतील नालेसफाई अजून पूर्ण झालेली नाही. 

मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबईतल्या नाल्यांची ८०% सफाई झाली असल्याची माहिती स्थायी समितीत दिलीय. परंतु प्रशासनाचा हा दावा खुद्द सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी पक्षांनीही खोडून काढला. 

शहरात म्हणावी तशी नालेसफाईची कामे झालेली नाहीत. काही ठिकाणी अजून कामांना सुरुवातच झालेली नाही, असं मत सर्व पक्षातील नगरसेवकांनी मांडले.