www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गोपीनाथ मुंडे गेले हे दुर्दैव आहे, या शिवाय दुसरी प्रतिक्रीया नाही. दु:ख आहे. धक्कादायक आहे. खऱ्या अर्धाने त्यांचे 10 वर्षांनंतर राजकीय करिअर सुरु झाले होते. अशा वेळी अशी घटना होणे हे दुर्दैव आहे. कोणाच्या बाबतीत अशी घटना घडणे दुर्दैव आहे.
अत्यंत महाराष्ट्राची आणि ग्रामीण भागाची जाण असणारा नेता आपल्यातून गेला हे दु:ख फक्त भारतीय जनता पक्षासाठी नाही आहे. माझे संबंध हे त्यांच्याशी खूप वर्षांपासून आहेत. अत्यंत एक उमदा नेता आपल्यातून गेला. वाईट वाटणे स्वाभाविक आहे. माझे आणि माझ्या पक्ष्यातर्फे मी त्यांना श्रद्धांजली वाहतो, असे राज ठाकरे यांनी शोकसंदेशाच्यावेळी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे राज्याचा एक लोकनेता हरपला आहे, अशी प्रतिक्रीया निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करून तीव्र दु:ख व्यक्त करत आपल्यासाठी आजची सकाळ दुर्दैवी ठरली, असे ते म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.