संगीतकार साजिद-वाजिद यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Updated: Dec 25, 2016, 10:25 PM IST
संगीतकार साजिद-वाजिद यांचा भाजपमध्ये प्रवेश  title=

मुंबई : प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात हे दोघं भाजपमध्ये दाखल झाले. भाजप युवा मोर्चाच्या युवा उर्जा या कार्यक्रमावेळी हा पक्षप्रवेश झाला.

या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी वाजिद यांच्याबरोबर 'ए वतन तेरे लिए' हे गाणंही गायलं. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस आहे. या कार्यक्रमानिमित्त फडणवीसांनी वाजपेयींच्या आठवणी सांगितल्या. अटलबिहारी वाजयेपींनी भारतीयांना सन्मानानं जगायाला शिकवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.