www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गोपीनाथ मुंडे यांना वास्तविक देशाचे कृषीमंत्री व्हायचे होते. त्यांना कृषी मंत्रालयातच अधिक रस होता. शरद पवार यांच्यानंतर हे मंत्रीपद आपल्याकडेच येणार, अशी अभिलाषा त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली.
पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जनसंघापासूनचे जुने संघटक मित्र बिहारचे राधा मोहनसिंह यांच्याकडे हे मंत्रालय दिले.
कृषी मंत्रालय असलेल्या ‘कृषी भवना’च्याच इमारतीमधे मागच्या बाजूला बसून मुंडे आता ‘ग्रामविकास’चा कारभार चालतो.
गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या 26 मे रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. नंतर मुंडे यांनी ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार स्विकारला होता. देशाच्या तिजोरीतून सर्वाधिक निधी संरक्षण मंत्रालयावर खर्च होतो. मात्र, त्या खालोखाल ग्रामविकास मंत्रालयाचा क्रमांक लागतो. गोपीनाथ मुंडे हे तब्बल 77 हजार कोटींचे बजेट असलेल्या या खात्याचे मंत्री होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.