रेल्वे बजेटः मध्य रेल्वेच्या अपेक्षा पूर्ण होतील का?

मध्य रेल्वचे लोकल वाहतुकी संदर्भातले अनेक प्रकल्प यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निदान यंदा मध्य रेल्वेच्या बाबतीत तोंडाला पाने पुसली जाणार नाही अशी आशा आहे.

Updated: Jul 4, 2014, 08:26 PM IST
रेल्वे बजेटः मध्य रेल्वेच्या अपेक्षा पूर्ण होतील का?  title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : मध्य रेल्वचे लोकल वाहतुकी संदर्भातले अनेक प्रकल्प यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निदान यंदा मध्य रेल्वेच्या बाबतीत तोंडाला पाने पुसली जाणार नाही अशी आशा आहे.

गेली अनेक वर्षे मध्य रेल्वेची अपेक्षाभंग करणारा अर्थ संकल्प म्हणून रेल्वे अर्थ संकल्प ओळखला जातो. मध्य रेल्वेचे काही प्रकल्प यंदा मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.

काय आहे अपेक्षा 

  • दादरची गर्दी कमी करणारा परळ टर्मिनस यावेळी मार्गी लागणे अपेक्षित आहे.
  • ठाणे ते सीएसटी या मार्गाचे डीसी ते एसी हे विद्युत् परिवर्तन झाल्यास नवीन लोकल ट्रेन येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • मेट्रोच्या वाढत्या गर्दीमूळे घाटकोपर रेल्वे स्थानकाची क्षमता वाढवणे गरजेचे आहे.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे रेल्वे स्थानकांवरील मुलभुत सोयी सुविधा वाढवल्यास प्रवाशंवर अनंत उपकार होतील.
  • ठाणे, कल्याण अशा गर्दीच्या स्थानकाकड़े विशेष लक्ष देण्याची गरज आहे
  • जीवघेणी गर्दी कमी करण्यासाठी आता सर्व लोकल गाड्या या 15 डब्याच्या कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
  • महिलांचा लोकल प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालला आहे, तेव्हा आता तरी पुरेसे लक्ष दिले जाणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे

नवीन सरकारचा हा पहिला रेल्वेअर्थ संकल्प असल्याने खूप मोठ्या अपेक्षा आहेत.

मध्य रेल्वेचा ही कर्जत खोपोली आणि कसारा, पनवेल अशी पसरली असून आता प्रवाशांची संख्या ही 38 लाखांच्या घरात पोहचली आहे. तेव्हा रेल्वेवरचा ताणही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.