मुंबईतील ट्रस्टची जमीन ताब्यात घेण्याचा इशारा

शहरात पाच ट्रस्टकडे असलेली शेकडो हेक्टर जमीन ताब्यात घेण्याचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या ट्रस्टकडे असलेल्या शेकडो हेक्टर जमीनीवर झोपड्या उभ्या आहेत. 

Updated: Dec 1, 2014, 10:35 PM IST
मुंबईतील ट्रस्टची जमीन ताब्यात घेण्याचा इशारा title=

मुंबई : शहरात पाच ट्रस्टकडे असलेली शेकडो हेक्टर जमीन ताब्यात घेण्याचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या ट्रस्टकडे असलेल्या शेकडो हेक्टर जमीनीवर झोपड्या उभ्या आहेत. 

या झोपडपट्ट्यांचा विकास एसआरए अंतर्गत करण्यास या ट्रस्ट तयार नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावून विकास करण्याबाबत सूचना केली जाईल. तरीही त्यांनी झोपड्यांचा विकास केला नाही तर या जमीनी सरकार ताब्यात घेईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. या ट्रस्टमध्ये 

१) दिनशॉ ट्रस्ट, गोरेगाव २) वाडिया ट्रस्ट, कुर्ला ३) जिजिबॉय बेहरामजी ट्रस्ट, मालाड ४) व्ही. के. लाड ट्रस्ट, दहिसर ५) मोहमद युसुफ खोत, भांडूप या ट्रस्टचा समावेश आहे.

दुसरीकडे मुंबईत मागील 20 वर्षांपासून रखडलेल्या एसआरए म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास योजना मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. 

मुंबई महापालिकेच्या जमीनीवरील 117 आणि म्हाडाच्या जमीनीवरील 96, अशा एकूण 213 योजना रखडल्या आहेत. त्या येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. 
मुख्यमंत्र्यांनी आज वांद्रे येथील एसआरए कार्यालयात येऊन या योजनांचा आढावा घेतला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.