ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं पडलं महागात...

मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर बोरिवली इथे लोकल ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं एका युवकाच्या अंगाशी आलंय. 

Updated: Jun 14, 2016, 08:38 AM IST
ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं पडलं महागात...   title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर बोरिवली इथे लोकल ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं एका युवकाच्या अंगाशी आलंय. 

युवकाला ओव्हर हेड वायरचा २५ हजार व्होल्ट्सचा करंट लागला. करंट लागल्यावर लगेच या युवकाच्या शरीराने पेट घेतला. अखेर तशाच अवस्थेत त्याला टपावरून खाली उतरवण्यात आलं. 

राजेंद्र दिखे असं या २५ वर्षीय तरूणाचं नाव आहे. ही घटना ६ जूनला घडलीय. त्याच्यावर नायर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.