मुंबईत समुद्रावर उभारला जाणार सर्वांत लांब पूल

 हा पूल सिवूडला बांधण्यात येण्यार आहे तेथील दलदलीच्या ठिकाणी थंडीच्या दिवसांमध्ये हजारो प्रकारचे पक्षी वास्तव्यास येतात.

Updated: Dec 9, 2015, 01:59 PM IST
मुंबईत समुद्रावर उभारला जाणार सर्वांत लांब पूल  title=

मुंबई : देशातील सर्वांत लांबलचक पूल मुंबईमध्ये उभारला जाणार आहे. या प्रोजेक्टचं 'मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (एमटीएचएल) असं नामकरण करण्यात आलंय.

२०१६ मध्ये हा प्रोजेक्ट सुरू होणार आहे. २०१९ पर्यत या प्रोजेक्टचं संपूर्ण बांधकाम पूर्ण होऊन हा पूल नागरिकांसाठी खुला होईल, असं सांगितलं जातंय. राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार समुद्रावर बनण्यात येणारा हा पूल तब्बल १६.५ किलोमीटर लांब तारांवर उभारला जाईल.

या प्रोजेक्टसाठी अंदाजे ११,००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी जपान इंटरनॅशनल कॉ-ऑपरेशन एजेन्सीकडून ७० टक्के आर्थिक मदत मिळणार आहे. तसंच सिटी इंडस्ट्रियल डेव्लेहपमेंट कॉर्पोरेशन आणि जवारलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) यांनी बाकी उरलेले आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय झालाय. हा  पूल नवी मुंबईत बनत येणाऱ्या एयरपोर्टला जोडण्यात येणार आहे.

सरकार लवकरच जेएनपीटी पोर्ट जवळील १००० हेक्टेयर्स जमिन अधिग्रहणाची क्रिया पार पाडणार आहे. नवी मुंबई एयरपोर्टसाठी ज्या प्रकारे जमिन अधिग्रहणाची क्रिया पारपाडण्यात आली त्या प्रकारेच या प्रोजेक्टसाठी ही नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येणार आहे. तेथे राहत असणाऱ्या स्थानिकांना पैशांसोबतच त्यांना विकसित जमिनीमधील शेयर ही देण्यात येतील. 

प्रोजेक्टसाठी १९७० पासून चर्चा सुरू होती. मात्र पर्यावण मंत्रालयाची मंजुरी मिळवण्यासाठी हा प्रोजेक्ट रखडला होता. कारण हा पूल सिवूडला बांधण्यात येण्यार आहे तेथील दलदलीच्या ठिकाणी थंडीच्या दिवसांमध्ये हजारो प्रकारचे पक्षी वास्तव्यास येतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.