मुंबई उपनगरात १२.५ अंश तापमानांची नोंद

पुण्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. आज शहराचा पारा ७.७ अंशांवर स्थिरावला.  तिकडे नाशिकमध्येही थंडीचा जोर कायम आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 11, 2017, 10:47 PM IST
 मुंबई उपनगरात १२.५ अंश तापमानांची नोंद  title=

मुंबई : राज्यात एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना राज्यात थंडीचा कडाका वाढत चालला आहे. आज राज्यातल्या तिन्ही महत्वाच्या शहरात यंदाचं नीचांकी तापमान नोंदवण्यात आल आहे. मुंबई उपनगरात १२.५ अंश तापमानांची नोंद करण्यात आली.  

पुण्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. आज शहराचा पारा ७.७ अंशांवर स्थिरावला.  तिकडे नाशिकमध्येही थंडीचा जोर कायम आहे. 

 नाशिकमध्ये पारा ५.८ अंशांपर्यंत उतरला. तिकडे देशात थंड हवेचं ठिकाण  म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये ६.८ अंश तर शहरातल्या वेण्णा लेक परिसरात तापमान २.२ अंशांपर्यंत खाली घसरलं. उत्तरेत पडलेल्या कमालीच्या थंडीमुळे राज्यात पुढचे काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.