मुंबई : जुहू चौपाटीवर सध्या एक नयनरम्य दृष्य तुम्हाला दिसू शकेल. समुद्राचं पाणी काही भागात निळ्या रंगात चमकत असलेलं बघायला मिळेल.
( व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली) मुंबईच्या समुद्रांवर प्रथमच हा नैसर्गिक चमत्कार दिसतोय.
प्रकाश बाहेर फेकणाऱ्या सूक्ष्म जीवांमुळे हे घडतंय. मुंबईतल्याच साधना कॉलेजच्या प्राणीशास्त्राच्या दोन विद्यार्थ्यांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात टिपलंय.
अबीर जैन आणि निलेश माने या दोघांना त्यांच्या एका मैत्रिणीनं याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोघांनी रात्रीच्या वेळी स्वतः जाऊन याची खात्री करून घेतली आणि छायाचित्रं टिपली.