कोण म्हणतं मुंबई-पुण्यात महिला सुरक्षित? - हायकोर्ट

मुंबई आणि पुणे ही शहरे महिलांसाठी सुरक्षित मानली जातात. मात्र आपणाला असं वाटत असेल की, महिला रात्रीसुद्धा बेधडकपणे बाहेर पडू शकतात.

Updated: Aug 28, 2012, 10:41 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई आणि पुणे ही शहरे महिलांसाठी सुरक्षित मानली जातात. मात्र आपणाला असं वाटत असेल की, महिला रात्रीसुद्धा बेधडकपणे बाहेर पडू शकतात. तर मात्र आता ह्या गोष्टीत बदल होत आहे.
पण ही दोन्ही शहरे महिलांसाठी आता असुरक्षित झाली आहेत, असे स्पष्ट मत आज मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. पुण्यातील विप्रो कंपनीच्या कॉलसेंटरमध्ये काम करणार्‍या ज्योतिकुमारी चौधरी या २२ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करून हत्या झाली होती.
याप्रकरणी सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकडे या दोघांचे अपील आणि फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जावर आज न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले.