सीबीआयला अधिकारच काय- चव्हाण

आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी ठरलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता मुंबई हायकोर्टाकत धाव घेतली आहे. सीबीआयने चव्हाण यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी ही तक्रार रद्द व्हावी, यासाठी चव्हाण यांनी याचिका केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 28, 2012, 03:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी ठरलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता मुंबई हायकोर्टाकत धाव घेतली आहे. सीबीआयने चव्हाण यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी ही तक्रार रद्द व्हावी, यासाठी चव्हाण यांनी याचिका केली आहे.
सीबीआयने चव्हाण यांच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रात असं म्हटलं आहे, की चव्हाण यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत सोसायटीच्या नियमांचं उल्लंघन केलंय. आपल्या ३ नातेवाइकांसाठी या सोसायटीत तीन फ्लॅट उकळले आहेत. मात्र, आपल्यावर केले गेलेले आरोप निराधार आहेत, सीबीआयच्या या आरोपपत्रामागे राजकीय हेतू असून मला त्यात गोवण्यात येतंय, असं चव्हाण यांचं म्हणणं आहे.
आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना चव्हाण यांनी सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. आदर्श सोसायटची जमीन राज्य सरकारची असून या घोटाळ्याची चौकशी करण्याचा अधिकार सीबीआयला नाही, असं चव्हाण यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्यावर सीबीआयने कुठलीही कारवाई करू नये यासाठी फौजदारी दंडसंहितेच्या कलम ४८२नुसार याचिका दाखल केली आहे. आथा हाय कोर्ट यावर काय निरणय देतंय, त्यावर पुढील कारवाई ठरेल.