राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.

Updated: Aug 2, 2015, 02:49 PM IST
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल title=

मुंबई: राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.

विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या मागोमाग एकनाथ शिंदे, दीपक सावंत, सुधीर मुनगंटीवार आणि राजकुमार बडोले हे सुद्धा, मंत्रिमंडळ बैठकांचे दांडीबहाद्दर ठरले आहेत. 

११ डिसेंबर २०१४ पासून जून २०१५ या कालावधीत राज्यमंत्रिमंडळाच्या एकूण २८ बैठका झाल्या. या कालावधीत झालेल्या बैठकांना १७ मंत्र्यांपैकी १६ मंत्र्यांची वरचेवर अनुपस्थिती राहिली आहे. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचा विकास आणि धोरणाबाबत महत्वाची चर्चा होते. मात्र या बैठकींनाच जबाबदार मंत्र्यानी दांडी मारल्याचं स्पष्ट झालं आहे. 

मुख्यमंत्री आणि अन्य १७ मंत्र्यापैकी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा अपवाद वगळता १६ मंत्र्यानी दांडी मारली. या दांडी बहाद्दरात ग्रामीण आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावत २८ पैकी ९ वेळा अनुपस्थित होत्या. 

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ वेळा अनुपस्थित राहत दुसरा क्रमांक पटकविला. यानंतर आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत ६, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार ५, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले ५, गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता ४, पर्यावरण मंत्री रामदास कदम ४, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे ३, महसूल मंत्री एकनाथ खडसे ३, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ३ यांची क्रमवारी आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.