अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई: मुंबईमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडू शकतो. मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागानंच हाय अलर्ट जारी केलाय.
15 ऑगस्टपूर्वी मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. 4 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात रिमोट कंट्रोल ड्रोन किंवा हवाई क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हल्ला होऊ शकतो, अशी भीती आहे.
पैरा ग्लायडर आणि रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाइट एअरक्राफ्टचा वापरही दहशतवादी करू शकतात, असा धोक्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर मुंबईत पॅरा ग्लायडिंग आणि ड्रोनच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.