मुंबई : आज दिनांक ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. महिलांनी विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मुंबई... जिला अनेक जण आपली आई मानतात... ती मुंबई... ज्या शहराच्या नावाचा उल्लेखही स्त्रीलिंगी केला जातो त्या शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज शेकडो महिला ऊन-पावसाची पर्वा न करता कष्ट करत असतात.
मुंबई पोलीस दलातील अशाच रणरागिणींना मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून आजच्या महिला दिनी मानाचा मुजरा केलाय. पोलीस दलाच्या विविध विभागांतील महिलांचा एक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अपलोड केलाय. 'आपलं कुटुंब तिच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच ती आपला अभिमान आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.' असा संदेशही त्यासोबत पोलिसांनी दिला आहे.
पाहा हाच तो व्हिडिओ.
Our family can never be complete without her & that is why she is our pride. Happy Women's Day! #SheThePride pic.twitter.com/RTsdb1zlWa
— Mumbai Police (@MumbaiPolice) March 8, 2016