मुंबई : भारतातील पहिली मोनो रेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा-चेंबूर मोनो रेलला आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र, एका वर्षानंतरही ही मोनोरेल मुंबईकरांच्या पसंतीला पचनी काही पडलेली दिसत नाहीय.
स्थानके वस्तीपासून दूर असल्यानं मोनोरेलचा फायदा तसा प्रवाशांना होत नाहीय. एक वर्षांनतर मोनो रेलला प्रवाशांचा मिळणारा अत्यल्प प्रतिसाद लक्षात घेता काही मुलभूत प्रश्न मोनोबद्दल निर्माण होतात.
मोनोबाबत झी मीडियाचे सवाल?
* मोनोरेलची प्रवासी संख्या वर्षानंतरही कमी का? यावर तोडगा निघेल का?
* मोनोरेल ही रस्ते वाहतुकीला पर्यायी वाहतूक म्हणुन सिद्ध झाली का?
* जेकब सर्कलपर्यंत अखेरचा आणि महत्त्वाचा टप्पा यावर्षी पूर्ण होणार का?
* मेट्रोच्या अन्य मार्गांची कामे सुरू असताना मोनोबाबत मौन का?
* देशातील पहिली म्हणून मुंबई मोनोचं ब्रँडिंग का केलं गेलं नाही?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.