आता अर्जदारांचं लक्ष म्हाडाच्या लॉटरीकडे

म्हाडाची लॉटरी ३१ मे रोजी वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली आहे.  

Updated: May 21, 2015, 04:10 PM IST
आता अर्जदारांचं लक्ष म्हाडाच्या लॉटरीकडे title=

मुंबई : म्हाडाची लॉटरी ३१ मे रोजी वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली आहे.  

तत्पूर्वी २५ मे रोजी स्वीकृत अर्जांची कच्ची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी २८ मे रोजी म्हाडाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख २० मे होती. १८ मे पर्यंत अर्ज दाखल केलेल्या १ लाख ५० हजार ५०० अर्जदारांपैकी १ लाख १३ हजार ८३५ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे.  बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतचा हा आकडा  आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.