www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत मेट्रो धावणार.. धावणार असं गेले अनेक वर्षापासून बोललं जातंय.. अखेर ते स्वप्न साकार होतंय.. अवघ्या काळी वेळातच मुंबई मेट्रो सुरू होतेय. मेट्रोच्या उदघाटनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणार आहेत. एमएमआरडीएनं मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण पाठवंलय. याच मुद्यावरुन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा ही साधलाय.
मुंबई मेट्रो वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर असा ११.४० किमीचा प्रवास अवघ्या २१ मिनिटांत पार करणारा मेट्रोचा हा पहिला टप्पा शहरातील पश्चिम-पूर्व उपनगरांना जोडेल. गेली सहा वर्षे सुरू असलेल्या या प्रकल्पावर आतापर्यंत ४३२१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. कंपनीनं मेट्रोचं तिकीट (स्वागत मूल्य) तुर्तास अवघे १० रुपये ठेवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
मेट्रो स्टेशनवर एस्कलेटर आणिप शिड्या दोहोंच्या साहाय्यानं या स्टेशनमध्ये जाण्याची सुविधा आहे. पहिल्या माळ्यावर प्रवेश केल्यानंतर प्रशस्त तिकीटघर लक्ष वेधून घेतं. तिकीटाचं कार्ड दाखविल्याशिवाय न उघडणारे स्वयंचलित दरवाजे `विदाऊट` प्रवास रोखतं. दुसऱ्या माळ्यावर मेट्रो प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. मेट्रोचे प्रत्येक रेल्वे स्टेशन १० हजार स्क्वेअर फूट इतक्या परिसरात व्यापलेलं आहे, अशी माहिती मेट्रोची चालक कंपनी असलेल्या `मुंबई मेट्रो वन`चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय मिश्रा यांनी दिली.
मेट्रो रेल्वेच्या शुभारंभाचे अनेक मुहूर्त चुकलेत, पाहा कोणते होते हे मुहूर्त
जुलै 2010
सप्टेंबर 2010
जुलै 2011
मार्च २०१२
नोव्हेंबर २०१२
मे २०१३
सप्टेंबर २०१३
डिसेंबर २०१३
मार्च २०१४
मे २०१४
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.