www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
मुंबईचं जिजामाता उद्यान अर्थात राणीची बाग नॅशनल पार्कमध्ये किंवा आरे कॉलनीमध्ये स्थलांतरित करावे, असा प्रस्ताव पर्यटन विभागानं राज्य सरकारला दिला आहे. शिवसेनेनं मात्र या प्रस्तावाला विरोध केलाय. तसंच आंदोलनाचा इशाराही दिलाय.
मुंबईचं जिजामाता प्राणीसंग्रहालय अर्थात राणीची बाग. एकेकाळी मुंबईची शान असणा-या या उद्यानाची पुरती रया गेलीय. आता हे जिजामाता प्राणी संग्रहालय बोरिवलीमधल्या नॅशनल पार्क किंवा गोरेगावच्या आरे कॉलनीत हलवण्याचा प्रस्ताव पर्यटन विभागानं सादर केलाय.
५७ एकराच्या या ऐतिहासिक हेरिटेज वास्तूत सध्या शहामृग, पाणघोडा, हरण, अस्वल, तरस, साळींदर, हत्ती, माकड आणि विविध जातींचे पक्षी आहेत. या जिजामाता प्राणीसंग्रहालयाचा मलेशिया आणि सिंगापूरच्या धर्तीवर विकास करण्यासाठी मुंबई महापालिकेनं ३००कोटीची तरतूदही केलीय. पण तीन वर्षांपासून केंन्द्र सरकारच्या झू आणि हेरिटेज विभागाच्या मान्यतेची महापालिका प्रतीक्षा करतेय. आता पर्यटन विभागानं या उद्यानाच्या स्थलातंराचा प्रस्ताव दिलाय. महापौरांनी मात्र या प्रस्तावाला विरोध केलाय.
जिजामाता प्राणीसंग्रहालयाच्या स्थलातंराआधी महालक्ष्मी रेसकोर्सचं थीम गार्डन करावं, अशी शिवसेनेची भूमिका आहे. मुंबईतल्या मोकळ्या भूंखडांविरोधात शिवसेनेनं राजकीय लढाई सुरू केलीय. आता जिजामाता प्राणीसंग्रहालयाचा मुद्दा शिवसेनेला आयता हाताशी मिळालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.