मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वेवर परिणाम

मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय. पश्चिम उपनगरांमध्येही संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण भरून वाहू लागलंय. सकाळपासूनच कोसळत असलेल्या सरींमुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. तसंच मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 3, 2012, 06:45 PM IST

www.24taas.com,मुंबई
आज दिवस होता तो पावसाचा. राज्यभर पाऊस धो धो बरसला. परतीच्या या दमदार पावसामुळं महाराष्ट्र सुखावला. विशेष म्हणजे दुष्काळाच्या झळा सोसणा-या मराठवाड्यातही आज पाऊस दणकून बरसला. मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय.
पश्चिम उपनगरांमध्येही संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण भरून वाहू लागलंय. सकाळपासूनच कोसळत असलेल्या सरींमुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. तसंच मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय.
लोकल पंधरा मिनीटं उशीरानं धावतायत. शहरात सकाळपासून आतापर्यंत 17.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. ठाण्यातील राम मारूती रोड, वंदना टॉकिज, नौपाडा, वसंत विहार, कोपरी परिसरात पाणी साचलंय. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतूकीचा वेग मंदावल्याचं दिसून येतंय.

ठाण्यात सुरु असलेल्या पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झालाय.. वाहतुकीचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळतंय.. तसंच मध्य रेल्वेची वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे.. मुंबईला पाणीपुरवठा कऱणा-या धरणक्षेत्रांमध्ये पाऊस चांगलाच बरसत असल्यामुळं धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झालीय.
मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे.. सकाळपासून सुरु असलेल्या संततधारेमुळं मुंबईकरांवरचं पाणीकपातीचं संकट दूर होण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या १० टक्के पाणीकपात सुरुय. मात्र मुंबई आणि उपनगर परिसरात कोसळत असलेल्या सरींमुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. तसंच या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण भरून वाहू लागलंय.
या पार्श्वभूमीवर १० टक्के पाणीकपातीचा आढावा घेण्याचे संकेत मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिलेत. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यानं पाणीकपातीचं संकट दूर होण्याची शक्यता निर्माण झालीय. तसंच कृत्रिम पावसाची आवश्यकता नसल्याचंही पालिका आयुक्त कुंटे यांनी म्हटलंय.