'शिवाजी पार्कवर शिवसेना-मनसेची मक्तेदारी नाही'

शिवाजी पार्कवर शिवसेना आणि मनसेची मक्तेदारी नाही असे खडे बोल मुंबई हायकोर्टाने सुनावले आहेत. 

Updated: Dec 2, 2016, 06:07 PM IST
'शिवाजी पार्कवर शिवसेना-मनसेची मक्तेदारी नाही' title=

मुंबई : शिवाजी पार्कवर शिवसेना आणि मनसेची मक्तेदारी नाही असे खडे बोल मुंबई हायकोर्टाने सुनावले आहेत. वारंवार अखेरची संधी देऊनही पर्यायी जागेचा विचार केला जात नसल्याचं निरिक्षण मुंबई हायकोर्टाने केलं आहे. 

शिवाजी पार्क मैदान हे मुंबईत राहणा-या लोकांसाठी राखीव असून राजकीय पक्षांनी त्यावर हक्क सांगू नये असं परखड मतही हायकोर्टानं मांडलं. शिवाजी पार्क जिमखान्यानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

नाताळ आणि नविन वर्षाच्या स्वागत समारंभासाठी लाऊडस्पिकरला यावेळी परवानगी नाकारली. सायलेन्स झोन घोषित असताना ध्वनीक्षेपकांना परवानगी देताच कामा नये असं स्पष्ट मत मुंबई हायकोर्टाने मांडलं.