मुंबई विमानतळ परिसरातील ४२७ इमारती पाडण्याचे आदेश

मुंबई विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारती जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 13, 2017, 08:36 AM IST
मुंबई विमानतळ परिसरातील ४२७ इमारती पाडण्याचे आदेश  title=

मुंबई : शहरातील विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारती जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. विमानतळ परिसरातील ४२७ इमारती आणि बांधकामे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या इमारतींवर हातोडा पडण्यार हे नक्की आहे. दरम्यान, या इमारतींची उंची कमीही होऊ शकते.

बांधकामे पाडण्याचे आदेश देताना या इमारतींची उंची कमी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने भरतीय विमानतळ प्राधिकरण, नागरी उड्डाण संचालनालय, मुंबई महानगरपालिका आणि अन्य नियोजन यंत्रणाना दिले आहेत. या इमारतीचे बांधकाम करणारे विकासक आणि तिथल्या रहिवाशांबाबत वाईट वाटण्याची गरज नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केलेय.

एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहाण्यापेक्षा कारवाई करा, असे आदेश न्यायलयाने दिले आहेत. या इमारतींची उंची हवाई वाहतुकीच्या मार्गावर अडथळे ठरत आहेत. त्यामुळे दोन टप्प्यांमध्ये या इमारतींवर कारवाई होणार आहे. २०१०-११ मधील ११० इमारतीवर दोन महिन्यांमध्ये आणि बांधकामे आणि २०१५-१६ मधील ३१७ इमारंतींवर तीन महिन्यात कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहे.