मुंबई : गोरेगाव येथील वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ असलेल्या एसआरपी कॅम्प इथल्या एसबीआय एटीएममधून १५ मार्च रोजी २८ लाख ६६ हजार रुपयाची चोरी झाली.
या प्रकरणात दोन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. एका आरोपीला मुबंईतून, दुसऱ्या आरोपीला सिंधुदुर्ग येथील वेंगुर्ला या ठिकाणाहून पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
या आरोपीकडून २१ लाखाची रोकड़ हस्तगत करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी विविध बँकेच्या एटीएममध्ये रोकड भरण्याचे काम करत होते.
मात्र सध्या नोकरी नसल्यामुळे त्यांनी चोरी केली असल्याची कबुली पोलिसांना दिली. या दोन्ही आरोपींना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.