मुंबई गँगरेप: दोन्ही खटल्यांची सुनावणी एकत्र सुरू

मुंबईत महालक्ष्मी इथं शक्तीमील कम्पाऊंड इथं ३१ जुलै २०१३ला झालेल्या आणि २२ ऑगस्टला महिला फोटोग्राफरवर झालेल्या गँगरेप प्रकरणाच्या खटल्याला आजपासून सुरुवात झालीय. या प्रकरणी आज आर्किटेक्चर संतोष कांदळकर आणि फोटोग्राफर संतोष जाधव यांची साक्ष घेण्यात आली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 21, 2013, 04:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत महालक्ष्मी इथं शक्तीमील कम्पाऊंड इथं ३१ जुलै २०१३ला झालेल्या आणि २२ ऑगस्टला महिला फोटोग्राफरवर झालेल्या गँगरेप प्रकरणाच्या खटल्याला आजपासून सुरुवात झालीय. या प्रकरणी आज आर्किटेक्चर संतोष कांदळकर आणि फोटोग्राफर संतोष जाधव यांची साक्ष घेण्यात आली.
याप्रकरणात एकूण पाच आरोपींवर शुक्रवारी आरोप निश्चित करण्यात आले. एकूण सहा आरोप या आरोपींवर करण्यात आले आहेत. त्यातला एक आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणाचं आरोपपत्र एकूण ३६२ पानांचं असून, ५२ साक्षीदार आहेत.
महिला फोटोग्राफरवरील बलात्काराच्या आरोपींपैकी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांवर ३१ जुलै रोजी टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या बलात्काराचा गुन्हा नोंद आहे. आता बुधवारी टेलिफोन ऑपरेटरची साक्ष होणार असून तिची साक्ष इन कॅमेरा केली जाणार आहे.
दरम्यान, पत्रकार तरुणीची साक्ष काल पूर्ण झाली. गुरुवारी सुनावणी दरम्यान तिला भोवळ आल्यानं काल पुन्हा तिची साक्ष नोंदवण्यात आली. कालही तिचा आवाज ठीक नसल्यानं माईक आणि स्पीकरच्या सहाय्यानं आज तिची साक्ष पूर्ण करण्यात आली.
शक्ती मिलमध्ये पत्रकार तरुणी आणि टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार या दोन्ही खटल्यांची सुनावणी एकत्रित सुरू झालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.