जे. डे. हत्याकांड: १२ आरोपींवर आरोप निश्चिती

ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय तथा जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आज १२ आरोपींवर आरोप निश्चिती होणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 21, 2013, 02:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय तथा जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आज १२ आरोपींवर आरोप निश्चिती होणार आहे.
प्रकरणातल्या दहा आरोपींसह गॅंगस्टर छोटा राजन आणि रिव्हॉल्व्हर पुरविणाऱ्या नयनसिंग बिस्त यांच्या विरोधात 3055 पानांचं आरोपपत्र पोलिसांनी विशेष "मोक्का` न्यायालयात ३ डिसेबंर २०११ साली दाखल केलं होतं.
अटक केलेल्या पत्रकार जिग्ना व्होराच्या नावाचा या तीन भागांच्या आरोपपत्रात उल्लेख होता तरीही, तिच्याबाबत पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले गेले. आज या प्रकरणातील १२ आरोपींवर आरोप निश्चित केले जातील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.