बॉयलरच्या स्फोटात चार कामगारांनी गमावला जीव

मुंबईतल्या चेंबूर परिसरातील आरसीएफ कंपनीत बॉयलरचा स्फोट झालाय. 

Updated: Jul 2, 2016, 11:14 PM IST
बॉयलरच्या स्फोटात चार कामगारांनी गमावला जीव title=
फाईल फोटो

मुंबई : मुंबईतल्या चेंबूर परिसरातील आरसीएफ कंपनीत बॉयलरचा स्फोट झालाय. 

या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीररित्या जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बॉयलर दुरूस्तीच्या कामावेळी हा स्फोट झालाय. या स्फोटामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसलंय.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्यात. असाच बॉयलरचा स्फोट काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत झाला होता.