मुंबई : मुंबईमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह आणि वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनांमध्ये कमालीची घट झालीय.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना दोन हजारांनी कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षी ड्रंक अँड ड्राईव्हच्या 16 हजार 13 केसेस दाखल झाल्या होत्या.
यंदा मात्र 14 हजार 602 घटनांची नोंद झाली आहेत. तर वाहतुकीचे नियम मोडणा-यांची गेली वर्षीची संख्या 21 लाखांवर होती ती आता 16 लाखांपर्यंत घटली आहे.
तळीरामांचे ठाणे...
ठाण्यात ३१ डिसेंबरच्या रात्री एक विक्रम झाला, विशेष म्हणजे, तो म्हणजे ड्रंक एन्ड ड्राइव्हचा.... एकूण 775 केसेस समोर आल्यात.
या सर्वांचा परवाना रद्द करण्याची शिफारस पोलिसांच्या वाहतूक शाखेनं आरटीओला केली आहे. गेल्या वर्षी ड्रंक एन्ड ड्राइव्हच्या 632 केसेस समोर आल्या होत्या.
मागील वर्षी ठाणे पहिल्या नंबरवर होते आणि यंदाही ठाणे पहिल्याच नंबरवर आहे. ठाण्यात एकूण 90 ठिकाणी ट्रॅप लवाण्यात आले होते.