मुंबई : प्रत्येक डब्यांमागे दरमहा १०० रूपये वाढवण्याचा निर्णय. मुंबई जेवण वाहतूक महामंडळाने घेतला आहे. मुंबईची ओळख बनलेल्या या डबेवाल्यांनी एका डब्ब्यामागे १०० रुपये तर डब्ब्याबरोबर पाण्याची किंवा ताकाची बाटली असेल, तर ५० रुपये अधिक मोजावे लागणार आहे.
मुंबईत सुमारे पाच हजार डबेवाले २ ते ३ लाख डबे दर दिवसाला पोहोचवत असतात.
मागील वर्षी २० ते ३० टक्क्यांची वाढ करण्यात आली होती त्यानुसार प्रत्येक डब्यामागे ७०० रूपये पडत होते. पण आता प्रत्येक डब्यांमागे १०० रूपये वाढवून आता ८०० रूपये पडणार आहेत.
डबेवाल्यांना या धंद्याव्यतिरिक्त इतर कुठलेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे असे वक्तव्य मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.