सावधान! बँकेच्या नावाखाली भामट्यांचा फोन, लाखोंचा गंडा

मुंबईतल्या आगरीपाडा भागात एका महिलेची बँकेच्या नावे फसवणूक झालीय. तब्बल 1 लाख 37 हजारांचा गंडा घालण्यात आलाय. अशाप्रकारे शेकडो जणांना फसवलं असण्याची शकयता आहे. 

Updated: Jul 8, 2015, 11:15 PM IST
सावधान! बँकेच्या नावाखाली भामट्यांचा फोन, लाखोंचा गंडा title=

अजित मांढरे झी मीडिया, मुंबई: मुंबईतल्या आगरीपाडा भागात एका महिलेची बँकेच्या नावे फसवणूक झालीय. तब्बल 1 लाख 37 हजारांचा गंडा घालण्यात आलाय. अशाप्रकारे शेकडो जणांना फसवलं असण्याची शकयता आहे. 

एटीएम नंबर, एटीएम सीसीव्ही नंबर, क्रेडीट कार्ड पीन, असली माहिती फोनवरून विचारून अनेकांना फसवल्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. अशी कोणतीही माहिती देऊ नका अशी सूचना बँकाही वारंवार करत आहेत. तरीही अनेकजण अशा प्रकारे माहिती देऊन चुका करतात. मुंबईतल्या आग्रीपाडा परिसरात सारा कांतावाला नावाच्या एका गृहिणीला बँक ऑफ इंडियातून बोलतोय असं सांगून फसवण्यात आलंय. तिच्याकडून तिच्या पतीच्या क्रेडीट कार्डाची माहिती मिळवली आणि त्यावरून 1 लाख 37 हजार रूपयांची खरेदी करण्यात आली. 

या क्रेडीट कार्ड फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी सलमान हनिफ खान याला अटक केलीय. त्याच्याकडून 10 मोबाईल, 1 लॅपटॉप आणि टीव्ही हस्तगत करण्यात आलाय. सलमान आणि त्याचे साथीदार असे फेक कॉल्स करून माहिती मिळवत आणि क्रेडीट कार्डाच्या आधारे ऑनलाईन खरेदी करून विकत घेतलेल्या वस्तू कमी किंमतीत विकत असंत

सलमान हानिफ खान आणि त्याच्या साथीदारांनी शेकडो जणांना अशाप्रकारे फसवल्याचं स्पष्ट झालंय. पोलीस या संदर्भात अजून तपास करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.