मुंबई : मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. वाढते गुन्हे रोखण्यासाठी आता मध्य रेल्वे महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही बसविणार आहे.
मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यातही आता सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रत्येक महिला डब्यात दोनपेक्षा जास्त सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. पुढील दहा दिवसांत सीसीटीव्ही कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलेय.
याआधी पश्चिम रेल्वेने लोकलच्या महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतलाय. डब्यात बसविण्यात येणाऱ्या या सीसीटीव्हीत ३० दिवसांचे चित्रीकरण होऊ शकते, असे मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेय. दरम्यान, सीसीटीव्हीचा खर्च बाहेर काढण्यासाठी सीसीटीव्ही कंपन्यांना दोन वर्षे या डब्यांच्या आत आणि बाहेर जाहिराती प्रसिद्ध करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.