मुंबई : जगातील सर्वात व्यस्त विमानतळ होण्याचा मान मुंबई विमानतळाने पटकावलाय. लंडनचे गॅटविक विमानतळ याआधी सर्वात व्यस्त विमानतळ होते. पण आता मुंबई विमानतळावरची विमानांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलीय.
मुंबई विमानतळावरून दर 65 सेकंदाला विमानाचं उड्डाण किंवा लँडिंग होतं. मात्र यात सरकारसाठी शरमेची बाब अशी की जगातल्या इतर कोणत्याही मेगा सिटीतल्या विमानतळवर एकाच धावपट्टीवरून उड्डाणं होत नाहीत. मात्र मुंबईत केवळ एक विमानतळ कार्यरत आहे आणि त्यावरून सर्वच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं होतात.
सध्या मुंबई विमानतळावरून दर दिवसाला 837 विमानांचं लँडींग अथवा उड्डाण होतं. तर लंडनच्या गॅटविक विमानतळावरून 757 लँडींग आणि उड्डाणं होतात.