मुंबई : शासनाने नव्याने स्थापन केलेल्या १०० नगरपरिषदा,पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव प्रवर्गाची आरक्षण सोडत मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. यात राज्यातील अनुसूचित जाती ६ तर अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३आणि खुल्या प्रवर्गातील २८ नगरपरिषदा महिलांसाठी राखीव आहेत.
राज्यात पूर्वीच्या असलेल्या २३९ व नव्याने स्थापन झालेल्या १०० नगरपरिषदा/ पंचायती अश्या एकूण ३३९ नगरपरिषदा, पंचायतींपैकी त्या त्या प्रवर्गाच्या एकूण लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी ४४, अनुसूचित जमातीसाठी १६, नागरीकांचा मागास प्रवर्ग ९२ आणि खुल्या प्रवर्गासाठी १८७ जागांचे आरक्षण आहे.
नव्याने निर्मिती १०० नगरपरिषदा, पंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी १३, अनुसूचित जमातीसाठी ६, नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी २७ जागांचे आरक्षण आहे तर उर्वरित ५४ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. या आरक्षणातील ५० टक्के पदे ही महिलांसाठी आरक्षित आहे. त्यांची सोडत आज काढण्यात आली.
नव्याने निर्मिती १०० नगरपरिषदा, पंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या तिवसा, माळशिरस, अर्जुनी, सावली, लाखनदूर, नायगांव, साकोली, भिवापूर, माढा, मालेगांव जहांगीर, सडक अर्जुनी, समुद्रपूर, चाकूर या १३ नगरपंचायतीपैकी तिवसा, माळशिरस, अर्जूनी, सावली, लाखनदूर व नायगांव या ६ नगरपरिषदा महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहे.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या धडगांव वडफाळया, सुरगाना, झरी झामणी, भामरागड, पेठ, मुलचेरा या ६ नगरपंचायतीपैकी धडगांव वडफाळया, सुरगाणा, झरी झामणी या ३ नगरपालीका महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अहेरी, फुलंब्री, शिरुर कासार (बीड), पारनेर, वाशी, औंढा नागनाथ, मोहोळ, देवरी, जळकोट, अक्कलकुवा, कसई दोडामार्ग, म्हसाळा, कुही, देवणी, राळेगाव, बाभुळगांव, शहापूर, गोंड पिंपरी, दिंडोरी, धानोरा, लाखनी, मोहाडी, संग्रामपूर, साक्री, लोणंद, लोहार बु. वडवणी या २७ नगरपरीषदा राखीव झाल्या आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या २७ राखीव जागांपैकी अहेरी, पारनेर, वाशी, देवरी, देवणी, बाभुळगांव, शहापूर, धानोरा, लाखनी, मोहाडी, साक्री, लोहार बु., वडवणी या १३ नगरपरिषदा महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.
खुल्या प्रवर्गातील ५४ नगरपरिषदांपैकी हिंगणा, देवळा, शिरुर अनंतपाळ (लातूर), मोताळा, जाफ्राबाद, भातकुळी, पाटोदा, घनसावंगी, चामोर्शी, मानोरा, तळा, जामखेड, बार्शी टाकळी, मारेगाव, कारंजा (वर्धा), बदनापूर, चाकण, गोरेगाव, मंडणगड, कळवण, एटापल्ली, खालापूर, पोलादपूर, धारणी, चिमूर, मंठा, कोरपना, सालेकसा या २८ नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
तर शेवगाव, महागाव, सेलू (वर्धा), हिमायतनगर, कर्जत (अहमदनगर), आष्टी (बीड), नांदगाव खंडेश्वर, चांदवड, कुरखेडा, कळंब, पालम, सेनगाव, निफाड, सिरोंचा, वाभावे वैभववाडी, अकोले (कर्जत), मुरबाड, पोंभुर्णा, कोरची, सोयगाव, जिवती, आरमोरी, माणगाव, आष्टी (वर्धा), आमगाव, कुडाळ या २६ नगरपरिषदा खुला प्रवर्गासाठी आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.