मुलुंडमध्ये भोंदूप्रकार, महिलेची चौकशी

 मुंबईसारख्या शहरात जादूटोणा, देवदेवस्की, करणी करणाऱ्या भोंदू लोकांनी ठिकठीकाणी आपले दरबार थाटलेत. अनेक नागरिक या भोंदू बाबांच्या जाळ्यात अड़कतायेत. मुलुंडच्या कदम पाड्यात देखील असाच एक प्रकार समोर आलाय.

Updated: Jul 2, 2014, 08:34 AM IST
मुलुंडमध्ये भोंदूप्रकार, महिलेची चौकशी title=

मुंबई : मुंबईसारख्या शहरात जादूटोणा, देवदेवस्की, करणी करणाऱ्या भोंदू लोकांनी ठिकठीकाणी आपले दरबार थाटलेत. अनेक नागरिक या भोंदू बाबांच्या जाळ्यात अड़कतायेत. मुलुंडच्या कदम पाड्यात देखील असाच एक प्रकार समोर आलाय.

मोलकरीणचं काम करणा-या नयना राठोड या महिलेनं वर्षभरापूर्वी आपल्या साथीदारांसह मुलुंडमध्ये आपल्या राहत्या घरात दरबार भरवलाय. मुल होत नाही, नोकरी लागत नाही, आजारपण अशा अनेक समस्याचं निराकरण करण्याचा तिच्या दाव्याला भुलून अनेकजण तिच्या दरबारात माथा टेकवायला येतात आणि पैश्यांची बोली लावून आपलं दु:ख दूर होईल या आशेने आल्या पावली परत जातात. मात्र, हाती काही लागल नसल्याने तक्रारी वाढत होत्या.

ही महिला अभीर-बुक्क्यासोबत आजार बरा करण्यासाठी गोळ्या देखील देत होती. या गोळ्या खाल्ल्यानं अनेकांना त्रासही जाणवू लागला. मुलुंडमधील सर्वपक्षीय महिलांनी या ठिकाणी जाऊन हा दरबार उधळून लावला. मुलुंड पोलिसांनी नयना राठोडला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.